माझी पहिली कविता !!!

काही प्रेमऴ व्याख्या
दोन मनान्च्या तारा अशा जुडतात, काही केल्या त्या तुटत नाहीत .
भावनान्चे धागे असे जखडतात , की प्रेमाच्या गाठी सुटत नाहीत .
कित्येक सन्कटे झेलून सुध्दा , प्रेमी मागे हटत नाहीत.
पण प्रेमाच्या या भावना , समाजाला कधी पटत नाहीत.
....... यालाच तर प्रेम म्हणतात .
त्याच्या मनातल्या भावना ,तिला काही कऴत नाहीत.
कऴल्या जरी भावना , तरी नाती त्यान्ची जुऴत नाहीत.
चुकून जुऴलि नाती , तरी शेवटी ती त्याला मिऴत नाही.
दारुत बुडालेल्या देवदासच दु:ख, समाजाला कधीच कऴत नाही.
.......... यालाच एकतर्फ़ी प्रेम अस म्हणतात .
विसरुन जुनी प्रेमप्रकरणे, आई वडीलान्च्या मताने नात ठरवाव.
रितसर मुलगी पहायला जाव , फुकटचा एक कप चहा पिउन याव.
मनातले भाव जुऴो ना जुऴो , आकाशातल्या ग्रहाना जुऴवुन पहाव.
गुपचुप पोटभर हुन्डा चापून , समाजात ताठ मानेने फिराव
............ याला सामाजकारणी प्रेम म्हणतात .
...............ॐकार

No comments: