माझ्या चारोळ्या

मनाची दुविधा

माझ्या मनी काय आहे,तिने कधी जाणलच नाही
मनचे गुपित माझ्या,मी ओठात कधी आणलच नाही
माझ्या नजरेचे इशारे तिला कधी कळलेच नाहीत
बोलायला शब्द माझ्याच्याने कधी जुळलेच नाहीत.


जेव्हा ती हसते

बोलता बोलता ती कधी
हऴूच नाजूक हसते
चन्द्राची कोर तिच्या
गालातल्या खऴीमध्ये दिसते.


माझ्या डोळ्यात पाहु नकोस
तुला तुझीच प्रतिमा दिसेल.
माझ्या डोळ्यांच हे सुदैव पाहुन
त्या दर्पणाला माझा हेवा वाटेल

मी हा असाच आहे

मी हा असाच आहे,
हो, मी असाच आहे,
लांडग्याच्या या दुनियेमध्ये, मी एक ससाच आहे.

पाठीवर आभाळ कोसळण्याच्यी भिती मला वाटते.
स्वता:च्याच अस्तित्वाची शंका मनी दाटते.
...चहुकडे सैतानाच्याच पावलांचा ठसा आहे,
लांडग्याच्या दुनियेमध्ये, मी एक ससा आहे.


लांडगे फिरतात इथे, घालून वाघाची कातडे
त्यांच्या मागे नाचतात, कळ्सुत्री ही माकडे
....लुच्चे झाले देशप्रेमी,नेसुन खादी कापडे
....असत्याचे राज्य सारे, सत्य झाले नागडॆ
सत्यवान होणं,या दुनियेत एक सजाच आहे
लांड्ग्यांच्या या दुनियेमध्ये, मी एक ससाच आहे.


उघड्या शवांभोवती, गिधाडे जशी नाचतात
मेलेल्या किट्कांभोवती ,मुंग्या जशा साचतात
..... तसेच सबळ, निर्बळांचे रक्त इथे शोषतात
........अहो! मानवाचं वर्तन पाहून श्वापदेही लाजतात
लाचारिने जगण्याचा मला, जुना वारसाच आहे.
लांडग्यांच्या या दुनियेमध्ये मी एक ससाच आहे.


तीन माकडांची शिकवण, मी नेहमिच मनी जपतो
काही अभद्र दिसता, डोळे स्वताचे मिटतो
.... स्वातंत्र्यापूर्वी होता,देश अजुनहि तसाच आहे.
..... लांड्ग्यांच्या या दुनियेमध्ये, मी एक ससाच आहे.
...... ॐकार

एम.बी.बी.एस


एम.बी.बी.एस

तिला म्हणालो,मला आजकाल झोपच येत नाही
काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.

...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.

अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.


मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.

रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.

ती म्हणाली,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे.

उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे

....... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.

अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.


मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.

त्याक्षणी ती उठली,आणि आत निघून गेली.

माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स"घेवून आली.

..... मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे.

अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.


एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.

तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.

नजरेस नजर मिळवून माझ्या,हळूच ती म्हणाली.

पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली.

........तर माझी ही केस अशी आहे.

एक एम.बी.बी.एस. माझी प्रेयसी आहे.

...ॐकार